Home /News /mumbai /

शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेचा 'दुसरा', संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!

शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेचा 'दुसरा', संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!


राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून आणायचा हे पक्ष बैठक घेऊन ठरवणार आहे.

राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून आणायचा हे पक्ष बैठक घेऊन ठरवणार आहे.

राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून आणायचा हे पक्ष बैठक घेऊन ठरवणार आहे.

मुंबई, 17 मे : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha MP eleaction ) जागेसाठी छत्रपती संभाजीराजे (sambhaj raje) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण, आता शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेनं (shivsena) 'दुसरा' टाकला आहे. शिवसेना आपला दुसरा उमेदवार देणार आहे, तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. एवढंच नाहीतर शिवसेना आणि काँग्रेसने सुद्धा संभाजीराजेंना पाठिंबा द्याव, याबद्दल विचारणा करणार असंही शरद पवार म्हणाले होते. पण, शिवसेनेनं आता दुसरा उमेदवार देण्याची भूमिका मांडून संभाजीराजेंची कोंडी केली आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणार आणि तो कसा निवडून आणायचा हे पक्ष बैठक घेऊन ठरवणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली. (भारताच्या गहू निर्यात बंदीमुळे जगावर येणार मोठं संकट? वाचा काय आहे परिस्थिती) तसंच, राज्यात स्थानिक निवडणुका कधी घ्यायच्या हा सर्वस्वी निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारकडून लागणाऱ्या यंत्रणांची आणि हवामान विभागाकडून माहिती घेईल, अशी माहिती परब यांनी दिली. विशेष म्हणजे,  राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सहाव्या जागेसाठी  शिवसेनेने (Shiv Sena) दावा केला असून या जागेसाठी आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीकडे राज्यसभेच्या चार जागा जिंकण्याची मते आहेत. सहाव्या जागेसाठी कुठल्याही पक्षाकडे विजयी होण्याइतपत मते नाही. या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय शरद पवारांनी (Sharad Pawar) संभाजीराजेंना पाठींबा दिला असल्याचा दावा संभाजीराजेंच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. (बँकेत FD करताना 'या' गोष्टींचा विचार करा; भविष्यातील नुकसान होणार नाही) भाजप संभाजीराजेंना समर्थन देणार की आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार हे पहावं लागेल. तसेच शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिला तर त्यासाठी महाविकास आघाडी समर्थन देणार का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या