Home /News /mumbai /

'तुमच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी', संजय राऊतांचं फडणवीसांना जशास तसे उत्तर

'तुमच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी', संजय राऊतांचं फडणवीसांना जशास तसे उत्तर

'तुमच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी', संजय राऊतांचं फडणवीसांना जशास तसे उत्तर

'तुमच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी', संजय राऊतांचं फडणवीसांना जशास तसे उत्तर

'तुम्हाला बांबू लागला, मिरच्या लागल्या, म्हणून पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागतंय. कालच भाषण सणसणीत, दणदणीत झालंय म्हणून आपण अस्वस्थ आहात'

    मुंबई, 24 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती भाषणानंतर भाजप आणि सेनेत कलगीतुरा रंगला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. मुळात  फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना जशास तसे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. 'मुंबईत पहिला नगरसेवक हा भाजपचा होता, शिवसेनेचा नाही. विधानसभेची पहिली निवडणूक शिवसेनेने लढविली, ती भाजपाच्या चिन्हावर' असा दावाच फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना जशास तसे उत्तर दिले. भाजप पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला त्यांनी आणला तर उत्तर देणे सोप होईल. भाजप १९८० च्या दशकातील आहे.  जनताापक्षाचे जेव्हा पतन झालं तेव्हा स्थापन झालेला पक्ष आहे. शिवसेनेचा जन्म १९६९ सालाचा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद्र गुप्ते, कधी होते? किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेऊ कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर येउ द्यात, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले. (Video Games खेळण्यासाठी कंपनीच देणार पैसे? वाचा काय आहे कारण) 'पाहिले आमदार त्याच काळात निवडून आले होते, वामनराव महाडिक, गिरगावात नवलकर, माजगावातून भुजबळ आमचे निवडून आले होते. भाजपच्या जन्माच्या आधी आमचे वाघ निवडून आले होते. फडणवीसांचा तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. मुळाच फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या या गोष्टी आहेत, असं म्हणत राऊतांनी सणसणीत टोला लगावला. 'राम मंदिराच्या लढ्याबद्दल इतिहास आहे, दस्ताऐवज आहे, रेकॉर्ड आहे, cbi कोर्टासमोर साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची साक्ष आहे, पुरावे आहेत. सेना नेत्यांना आरोपी केलं होतं त्यात. एवढंच नाहीतर लालकृष्ण अडवाणी, ठाकरे त्यातले आरोपी आहेत, मग कोर्ट मूर्ख होते का? असा खोचक सवाल राऊतांनी फडणवीसांना केला. 'राजकीय कोणते पक्ष नव्हते. आमचे प्रमुख लोक गेले होते , तेव्हाचा सामना पाहिलात तर कोण कोण गेलं होतं त्याची यादी छापली होती. त्याकाळी सेना भवनात वॉर रूम होती. कोणाला काही माहिती द्यायची असेल, कितीही माहिती फसवले, तरी लोकांना ठाऊक आहे. अयोध्या लढ्यातील सेनेच काम ऐतिहासिक आहे, असंही राऊत म्हणाले. 'थंड पडलेला लढा तेव्हा उद्धव ठाकरे दोनदा गेले होते अयोध्येला आणि जागृत केलं. मोदींनी करुन दाखवलं नाही, न्यायालयाने निर्णय दिला. रंजन गोगाई यांनी निर्णय दिला होता आणि नंतर खासदार झाले, असंही राऊत म्हणाले. (उत्तर प्रदेशातील 'या' नदीच्या पाण्याला लोक स्पर्शही करत नाहीत, कारणही आहे रंजक) ' औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावर बोलताय, मग आपणही 5 वर्ष मुख्यमंत्री होता. हिंदुत्ववादी म्हणून होतात ना? नाव बदलायला केंद्राने मंजुरी द्यावी लागते. 5 वर्षात आपण का दिलं नाही? 'योगिनीं प्रयागराज करून घेतल तुम्ही तेव्हा का नाही केलं. बाळासाहेबांनी संभाजी नगर केलेलं केव्हाच आहे, तुम्ही काय केलं? असा थेट सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारला. 'आम्हाला गरज नाही, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व महान आहे. कोणी ट्विट केलं तर ते मोठे होणार नाहीत, असं म्हणत राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ट्वीट न केल्याच्या विधानावर उत्तर दिले. 'पालिकेच्या निवडणुका राजकीय पक्षाकडून लढवल्या जातात. भाजप पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे , तो कायम राहो. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काही बोलायलाच नव्हतं मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन दखल का घेता? तुम्हाला बांबू लागला, मिरच्या लागल्या, म्हणून पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागतंय. कालच भाषण सणसणीत, दणदणीत झालंय म्हणून आपण अस्वस्थ आहात, असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला. 'पक्ष प्रमुखांनी संदेश दिलाय, सगळ्या निवडणूक लढवणार आहोत. पक्षाच्या विस्तार होईल. राष्ट्रीय पातळीवर तेजाने निवडून येईल. पण भाजपच्या लोकांना आपल्या पूर्व इतिहासाचा विस्मरण झालं असेल तर शिबीर घेऊ. मार्गदर्शन मीच करेन, अशी खिल्लीही राऊतांनी उडवली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या