मुंबई पालिकेत शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी, अखेर चहल यांनी मागितली माफी!

मुंबई पालिकेत शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी, अखेर चहल यांनी मागितली माफी!

आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात पोहोचले होते

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी पाहण्यास मिळाली. शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप केला आहे. अखेर या वादावर 'मला लहान भाऊ समजून माफ करा' असं म्हणत चहल यांनी माफी मागितली आहे.

आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात पोहोचले होते. मात्र, कोणतेही अधिकारी हजर नव्हते. त्यानंतर  महापौर किशोरी पेडणेकर यांनी आयुक्त इकबाल चहल यांना फोन केले होते. पण, तुम्हाला थोडे थांबता येत नाही का? तुम्ही पॅनिक कशाला होता? अशा भाषेत चहल यांनी उत्तर दिले होते, असा आरोप पेडणेकर यांनी केला. त्यानंतर सेनेच्या नेत्यांनी पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्त स्वत: ला काय समजता, जर पदभार सांभाळता येत नसेल तर राज्य शासनात परत जावे, अशी टीका महापौरांनी केली.

तर, आपण अनेक वेळा कामाच्या निमित्ताने चहल यांना फोन केले. पण फोन करूनही मी कामात आहे, कोविड रुग्णालयांना भेट देत आहे, तुम्हाला संयम नाही का? अशा भाषेत उद्धट उत्तरं देतात, असा आरोप राऊत यांनी केला होता.

या वादानंतर आयुक्त इकबाल चहल यांनी  महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजू माफ करावे, असं म्हणत चहल यांनी विनंती केली.

चहल यांनी माफी मागितल्यामुळे महापौर पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनीही नरमाईची भूमिका घेतली. 'लहान भावानंही इथून पुढे मोठ्या बहिणींचं ऐकावं' असं सांगत महापौर आणि विशाखा राऊत यांच्याकडूनही वादावर पडदा पडला.

Published by: sachin Salve
First published: October 14, 2020, 1:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या