Home /News /mumbai /

Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, 'त्या' विधानावरुन संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, 'त्या' विधानावरुन संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, संजय राऊतांच्या 'त्या' विधानावरुन भाजप आक्रमक

Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, संजय राऊतांच्या 'त्या' विधानावरुन भाजप आक्रमक

BJP demands fir against Sanjay Raut: दिल्लीत पत्रकार परिषदेत भाष्य करताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन आता भाजपने त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा वाद (Shiv Sena vs BJP) निर्माण झाल्याचं दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या विरोधात शिवसेनेने गुन्हा दाखल केला त्यानंतर आज आशिष शेलार हे पोलीस स्टेनशमध्ये उपस्थित झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. त्याच दरम्यान दिल्लीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (BJP demands fir against Sanjay Raut over his objectionable remark) FIR चुकीचा, मागे घ्या भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं, राजकीय सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या कुटुंबाचा मृत्यू हा हलगर्जीपणामुळे झाला आहे. या मुद्द्याावरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे जावं म्हणून न केलेल्या विधानावरुन आशिष शेलार यांच्यावर पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल केला. आशिष शेलार यांनी आज पोलीस ठाण्यात येऊन आपली बाजू मांडली आणि त्यापूर्वी म्हणजेच कालच आशिष शेलार यांनी अधिकृत वक्तव्याचं रेकॉर्डिंग पोलिसांना दिलं आहे. केवळ राजकीय दबावामुळे आणि मुद्द्यावरुन लक्ष विचलित व्हावं यासाठी गुन्हा दाखल केला आहे. हा चुकीचा एफआयआर आहे आणि तो मागे घ्यावा अशी मागणी आम्ही केली आहे. वाचा: भाजपला मोठा झटका, आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल संजय राऊतांवर FIR दाखल करा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज भाजप आणि भाजपच्या महिलांबाबत अत्यंत असभ्य आणि घाणेरडा शब्द वापरला. संजय राऊत यांनी तो शब्द एकदा नाही तर दोनदा वापरला. त्याच्यावरुन भाजपने याबाबत तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. राज्य महिला आयोग आणि केंद्रीय महिला आयोगाकडे संजय राऊत यांच्या तक्रार दाखल करणार आहोत असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. खोटा गुन्हा दाखल केला आशिष शेलार म्हणाले, मी माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियातही याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मी कुठल्याही व्यक्तीला, महिलेला, महापौरांना उद्देशून किंवा नाव घेऊन ते वाक्य उच्चारलं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश हा अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठी स्वत:च्या अंगावर ओढवून घेण्याचं काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केलं. जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत. जो काही खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत मी जामीन घेतला तसेच हा एफआयआर रद्द केला पाहिजे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. वाचा : आशिष शेलारांच्या वक्तव्यावर सेना आक्रमक होताच, भाजपची सपशेल माघार! संघर्ष आणखी तीव्र करणार मी पुन्हा एक सांगू इच्छितो, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकार्तेपणाच्या विरोधात भाजप संघर्ष आणखी कडवा करणार. तुम्ही आमचा आवाज जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढाच मुंबईकरांचा आवाज भाजप मोठ्याने उचलेल आणि तुमच्या कृत्याला जनतेसमोर आणू असंही आशिष शेलार म्हणाले. काय म्हणाले होते संजय राऊत? राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या विरोधात निलंबित 12 खासदार हे संदसेदच्या परिसरात आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मंगळवारी शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी संजय राऊत हे खुर्ची उचलून शरद पवारांना बसण्यासाठी देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन भाजपनेही निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुचर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात गेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही जर गोष्ट गुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राराची संस्कृती नसून विकृती आहे." याच दरम्यान टीका करताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दही उच्चारले आणि त्यावरुनच भाजपने आता संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ashish shelar, BJP, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या