मुंबई, 7 सप्टेंबर: शिवसेना पुरस्कृत शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांनी वाहतूक सेनेच्या पदाधिकारीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दीपक महेश्वरींविरुद्ध आरसीएफ पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताला आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निफोट यांनी दुजोरा दिला.
काय आहे प्रकरण?
34 वर्षीय तक्रारदार महिला शिव वाहतूक सेनेची पदाधिकारी असून चेंबुर परिसरात राहते. महिला आणि महेश्वरी हे मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओलखतात. 28 मे रोजी तक्रारदार महिला काही कामानिमित्त महेश्वरी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी 'तु्म्ही मला आवडतात, सोबत राहात जा.', असे महेश्वरीने महिलेला म्हटले होते. या प्रकाराचा राग आल्याने पीडित महिला तिथून निघून आली होती. त्यानंतर महेश्वरी आपल्याला रात्री-अपरात्री कॉल केले. महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच तिला अश्लील शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे महिला घाबरली. ती आजारी पडली. अखेर महेश्वरीच्या जाचाला कंटाळून पीडितेने शुक्रवारी पोलीस स्टेशन गाठून महेश्वरी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन महेश्वरी यांच्याविरुद्ध विनयभंग, अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अद्याप पोलिसांनी महेश्वरीला अटक केली नाही.
लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा