डोंबिवलीत सत्तेत असूनही सेनेचा फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीत सत्तेत असूनही सेनेचा फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाबाहेर बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर येत्या दोन दिवसांत कारवाई करा, अन्यथा शिवसेना कायदा हातात घेऊन शिवसेना स्टाईलने फेरीवाल्यांवर कारवाई करेल, असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

16 मे : डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाबाहेर बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर येत्या दोन दिवसांत कारवाई करा, अन्यथा शिवसेना कायदा हातात घेऊन शिवसेना स्टाईलने फेरीवाल्यांवर कारवाई करेल, असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात सोमवारी युवासेनेनं मोठं आंदोलन केलं होतं. यानंतर चार कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर आज शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना याबाबत निवेदन दिलं. येत्या दोन दिवसांत जर फेरीवाले हटले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाऊ चौधरी यांनी दिलाय. विशेष म्हणजे शिवसेनाच सत्तेत असूनही आंदोलनाचा इशारा देतेय.

First published: May 16, 2017, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading