शिवसेनेकडून जीवाला धोका, भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

शिवसेनेच्या या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी भाजपकडून किरीट सोमय्या मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती.

  • Share this:

मुंबई 18 डिसेंबर : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे शिवसेनेवर कायम टीका करण्यासाठी ओळखले जातात. युती तुटल्यानंतर शिवसेनेवर तोफ डागण्याचं काम भाजपकडून किरीट सोमय्या यांनीच केलं होतं. त्यांनी थेट मातोश्रीवरही तोफ डागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज होते. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट द्यायला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. या विरोधामुळे भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होतं. आता शिवसेनाच सत्तेवर आल्याने परिस्थिती बदललीय. शिवसेनेकडून जीवाला धोका आहे त्यामुळे सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी असा खबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याबाबत त्यांनी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवलं आहे. किरीट सोमय्या म्हणाले, मी अनेक घोटाळे आत्तापर्यंत उघडकीस आणले, अनेक प्रकरणं उघड केली.

'थ्री इडियटम'ध्ये करीना कपूर परत येते तसं शिवसेनाही येईल, मुनगंटीवारांची टोलेबाज

पण मला कधी भीती वाटली नाही. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे लोक हल्ला करण्यासाठी आले होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आताही काही धमक्या येत आहेत. शिवसेनेची ही गुंडगीरी जगासमोर यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठविल्याचंही त्यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं.

उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. शिवसेनेकडून भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत होती. शिवसेनेच्या या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी भाजपकडून  किरीट सोमय्या मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती.

त्यावरून शिवसेनेचे नेते आणि सोमय्यांमध्ये वादही झालेत. त्याचा राग असल्याने सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी शिवसेनेनं केली होती त्यानंतर सोमय्यांना तिकीट नाकारलं होतं.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading