शिवसेनेने सावरकरांवर सवाल उठवणाऱ्यांना तासले, काँग्रेसवरही साधला निशाणा

शिवसेनेने सावरकरांवर सवाल उठवणाऱ्यांना तासले, काँग्रेसवरही साधला निशाणा

स्वातंत्र्य लढ्यात आणि देश घडवण्यात कोणतेही योगदान नसलेले लोक सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. आता ही फॅशन झाली आहे

  • Share this:

मुंबई,22 डिसेंबर: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सवाल उठवणाऱ्यांनी शिवसेनाने पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या 'रोखठोक' या सदरातून खालदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देश घडवण्यात कोणतेही योगदान नसलेले लोक सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. आता ही फॅशन झाली आहे, अशी खोचक टीका करत शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला. वीर सावरकरांवरून पुन्हा वादळ उठले आहे. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितल्यामुळेच त्यांची सुटका झाली. सावरकर हे माफीवीर आहेत, असे आरोप पुन:पुन्हा होत आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागबद्दलही अनेकही शंका उपस्थित केल्या जातात. पण सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशत्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेल यांच्या वाट्याला आल्या नाहीत.

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली, असे बोलले जाते परंतु ते अर्धसत्य. मात्र त्यांनी माफी मागितलीही असेल, यात काय चूक केली. ब्रिटिश राजवटीत कोणी प्रसंगानुसार देशभक्त बनला तर कोणी अपघाताने. परंतु सावरकरांचे क्रांतिकार्य अमर आहे. 14 वर्षे अंदमानात त्यांनी यातना भोगल्या. अटी शर्तींवर त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. सावरकरांनी बाहेर यावे, ही सगळ्यांचीच इच्छा होती. सावरकरांनी ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर सावरकर हसत हसत फासावर गेले असते. सावरकरांनी मृत्यूला अनेकद चकवले. त्यांनी अंदमानानंतरचे रत्नागिरीतले आयुष्यही राष्ट्रीय कामासाठीच अर्पण केले, अशा शब्दात वीर सावरकरांवर सवाल उठवणाऱ्यांना शिवसेनेने तासले आहे.

दुसरीकडे, 'सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में!किती के बाप का हिंदुस्तान थोडी है' असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2019 08:58 AM IST

ताज्या बातम्या