मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या, वाजवत बसा अन् मंदिरे उघडा मागणी करण्यास बजावले" शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

"भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या, वाजवत बसा अन् मंदिरे उघडा मागणी करण्यास बजावले" शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

'आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...'

'आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...'

शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई, 4 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवडणुकीपूर्वी दाखवलेल्या 'अच्छे दिन'चे (Acche Din) विदारक चित्र समोर आले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाच्या जीडीपीचे गुलाबी चित्र दोन दिवसांपूर्वीच रेखाटले. त्या गुलाबाचे काटे आता टोचू लागले आहेत आणि पाकळ्या झडू लागल्या आहेत असं म्हणत शिवसेनेने (Shiv Sena) सामनाच्या (Saamana) माध्यमातून केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे.

सामानाच्या अग्रलेखाच्या म्हटलं आहे, ऑगस्ट महिन्यात 16 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारीने कहर केला आहे. शहरांतही वेगळी स्थिती नाही. लोकांना, तरुणांच्या हाताला काम हवे आहे. भाजपने बेरोजगारांच्या हाती घंटा दिल्या आहेत. घंटा वाचवत बसा व मंदिरे उघडा अशी मागणी करत रहा असे बजावले आहे.

तालिबान आज सरकार स्थापन करण्याची शक्यता; पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा

घंटा बडवून वगैरे बेरोजगारीचा राक्षस मारला जाणआर असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगार निर्मितीचे दालन उघडायला हवे. 16 लाख हा आकडा अलीकडचा आहे. मोदी सरकारने जी बेजबाबदार नोटबंदी देशावर लादली, त्या नोटबंदीने कोसळलेल्या अर्थव्यवस्थेखालीच दोनएक कोटी रोजगार चिरडला गेला. नोटबंदी हे अर्थव्यवस्थेवरचे भयंकर संकट होते व त्यातून दोन कोटींवर लोकांनी कायमच्या नोकऱ्या गमावल्या असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱ्यांचे काय करणार? असा सवालही विचारण्यात आला आहे.

First published:

Tags: BJP, Shiv sena