मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण (Mumbai Sakinaka Rape case) ताजे असतानाच मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग (Woman molested in (Mumbai BJP corporator office) झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपवर सामनाच्या (Saamana editorial) माध्यमातून जोरदार टीका केली आहे. मुंबई तर जगातील सर्ववात सुरक्षित शहर आहे. तरीही साकीनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. पुन्हा मध्ये बोरिवली भाजप कार्यालय लागतेच. हे सर्व भयंकर प्रकार एक प्रकारच्या मानसिक विकृतीतून घडत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल.
त्या राजकारणाचीही किळस वाटते
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, मुंबईतील साकीनाक्यातील घटनेच्या जखमांचे व्रण ताजे असतानाच डोंबिवलीच्या घटनेने महाराष्ट्राचे समाजमन हादरले. विकृतीचा कळस गाठणाऱ्या घटना देशभरात वाढत आहेत. त्यात महाराष्ट्रानेही सामील व्हावे याची खंत वाटते. 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत घडली. हे अत्याचार गेले आठ महिने सुरू होते. ही अशी प्रकरणे समोर येतात व राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करुन आपापल्या राजकीय मतलबाच्या पोळ्या भाजतात तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते.
तोंडाला कुलूप ठोकून बसलेत
डोंबिवली प्रकरणाचा गवगवा सुरू असतानाच बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले आहेत अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.
बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या; Suicide note वाचून पोलीसही हादरलेहे धोरण दुटप्पी
भाजपच्या कार्यालयात ज्या महिलेचा विनयभंग झाला ती त्यांचीच कार्यकर्ती आहे. या पीडित महिलेनेही पोलिसांत गुन्हा दाखल करुन न्यायाची मागणी केली आहे. बोरिवली प्रकरणातही भाजपच्या ताई-माई-अक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला ते साकीनाका, डोंबिवलीप्रकरणी. हे धोरण दुटप्पी आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं, राज्यपालांना महाराष्ट्रातील अशा घटनांची चिंता वाटते व ते तत्काळ मुख्यमंत्र्यांशी पत्राचार करुन विशेष अधिवेशनाची सूचना करतात. अशा घटना दुर्दैवीच आहेत. पण समाजाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. विकृतीने कळस गाठला आहे. त्यातून हे भयंकर गुन्हे घडत आहेत. महिला सुरक्षा, लैंगिक अत्याचाराबाबत कठोर कायदे होऊनही विकृतांकडून हे असले प्रकार घडतच आहेत. डोंबिवलीजवळील कल्याणमध्ये एका आठ वर्षांच्या बालिकेवर शिक्षकाकडूनच अत्याचार झाला. हे भयंकर प्रकार फक्त कायद्याने थांबतील अशी अपेक्षा करात येणार नाही. शेवटी समाजातील वाढत्या विकृतीचाही प्रश्न आहेच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.