शिवसेनेचा विरोध मावळला, रामनाथ कोविंद यांना पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत आणि स्वामिनाथन यांचं नाव पुढे करणाऱ्या शिवसेनेचा विरोध अखेर मावळलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2017 04:32 PM IST

शिवसेनेचा विरोध मावळला, रामनाथ कोविंद यांना पाठिंबा

20 जून : राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत आणि स्वामिनाथन यांचं नाव पुढे करणाऱ्या शिवसेनेचा विरोध अखेर मावळलाय. शिवसेनेनं एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिलाय.

दलित मतांसाठी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देत असाल तर सेनेला यात रस नाही असं म्हणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर माघार घेतलीय. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केवळ आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही अशी भूमिका जाहीर करत राम नाथ कोविंद यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.

आम्ही मोहन भागवत आणि स्वामिनाथन यांचं नाव सुचवलं होतं. आजही आमचा या दोन नावांसाठी आग्रह असणार आहे. पण अमित शहा यांच्यासोबत काल फोनवर चर्चा झाली. त्यांनी रामनाथ कोविंद यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आम्ही कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...