शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी या धमकीची नोंद घेतली असून धमकी देणाऱ्याची माहिती काढली जात आहे. सर्व शक्यता गृहित धरून तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोंबर : शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि नगरसेविका शितल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. आशिष केआर द्विवेदी नावाच्या इसमाने ही जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरुन दिली आहे. त्याविरोधात शितल म्हात्रे यांनी एम एच बी कॉलोनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी या धमकीची नोंद घेतली असून धमकी देणाऱ्याची माहिती काढली जात आहे. सर्व शक्यता गृहित धरून तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रियंका चतुर्वेदी यांनी याआधी काँग्रेसचं प्रवक्तेपद सांभाळलं होतं. 19 एप्रिलला त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना प्रवेश केला होता.

विजय शिवतारेंची 'टिव-टिव' बंदच करून टाकली, अजित पवारांनी सांगितला किस्सा!

प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी या दिल्लीतल्या शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होत्या. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असताना खडसेंची दांडी

काँग्रेस पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस प्रवक्ता असल्याचं काढून टाकलं. त्यांनी  रात्री काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष राहुल गांधींकडे दिला. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले असताना प्रचाराच्या ऐन धामधुमीत राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या चतुर्वेदींच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 11:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading