डोंबिवलीत शिवसेनेने रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याची काढली धिंड

रावसाहेब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून त्याला शिव्यांची लाखोली वाहून चपलेचा प्रसाद देण्यात आला.

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 05:49 PM IST

डोंबिवलीत शिवसेनेने रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याची काढली धिंड

प्रदीप भणगे, डोंबिवली

11 मे : शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेतर्फे डोंबिवलीत तीव्र निषेध करण्यात आला. रावसाहेब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून त्याला शिव्यांची लाखोली वाहून चपलेचा प्रसाद देण्यात आला.

जालन्यात एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवी हासडली होती. त्यांचे हे वक्तव्य समोर येताच सर्वच स्तरातून त्यांचा मोठा निषेध केला जात आहे. डोंबिवली शहर शिवसेना शाखेतर्फे आज जोरदार आंदोलन करून रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून त्याला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला शहरप्रमुख कविता गावंड, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close