मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली'; आशिष शेलारांचा घणाघात

'शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली'; आशिष शेलारांचा घणाघात

Ashish Shelar on Shiv Sena: शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 16 जून: राम मंदिर (Ram Mandir) बांधकामातील जागेवरून शिवसेनेने (Shiv Sena) आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून केलेल्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आज मुंबईत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले (Shiv Sena BJP clash) आणि मोठा राडा झाला. या प्रकरणात आता पोलिसांतही तक्रार दाखल झाली असून राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. या घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.

या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आशिष शेलार यांनी म्हटलं, युवा मोर्चाचे आमचे प्रतिनिधी पोलिसांना सूचना देऊन करत होते. लपून-छपून पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करत शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.

आशिष शेलार यांनी पुढे म्हटलं, लपून छपून पोलिसांच्या आड राहून हल्ले कसले करताय. रणांगणात समोर या भारतीय जनता पार्टी तुम्हाला चारी मुंड्या चित करण्यासाठी तयार आहे. या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. महिला कार्यकर्त्यावर हल्ला करत शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. हिंदीत एक म्हण आहे लातो के भूत बातों से नही मानते त्यामुळे यापुढे चर्चेने चालणार नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार.

'कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार' - किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, "मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे? शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार आणि त्याचा हा भाग असेल. सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ashish shelar, BJP, Shiv sena