मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

समझनेवाले को इशारा काफी है! संजय राऊत यांचं भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज

समझनेवाले को इशारा काफी है! संजय राऊत यांचं भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज

अचानक गोदी मीडियामधील कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर.

अचानक गोदी मीडियामधील कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर.

अचानक गोदी मीडियामधील कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 30 डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv sena Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नवे समन्य बजावले आहेत. आता वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला ED समोर हजर व्हावे लागणार आहे. त्यावरून ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातील राजकरण चांगलंच तापलं आहे. संजय राऊत हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. शिवसेनेनं दैनिक 'सामना'तून भाजपवर जहरी बाण डागल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून समझनेवाले को इशारा काफी है! असं सांगत भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. हेही वाचा...राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल 'अचानक गोदी मीडियामधील कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचं नाव PMC आणि HDIL स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!', असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED नोटीस बजावल्यामुळे राज्यात रान पेटलं आहे. वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला ED समोर हजार राहाण्याचा निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाही. त्यामुळे त्यांनी ED नं नवे समन्स बजावले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असं वर्षा राऊत यांना सांगण्यात आले आहे. प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची यापूर्वी चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे शिल्लक असल्याचं EDच्या समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सामना ऑफिसमध्ये भेट घेतली. काय आहे प्रकरण? दरम्यान, PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. हेही वाचा...डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण... शिवसेनेचा भाजपवर निशाणा वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ED ला हवी असल्याचं समजते.
First published:

पुढील बातम्या