Home /News /mumbai /

पंडित नेहरूंशी वैर का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

पंडित नेहरूंशी वैर का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल

स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

  मुंबई, 5 सप्टेंबर : इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' या संस्थेने 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरुन पंडित नेहरूंचे चित्र वगळले. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक सवाल विचारला आहे. पाहूयात संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. पंडित नेहरूंशी वैर का? राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल पण पंडित नेहरूंशी वैर का? नेहूंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे शौर्य नाही. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलला जातोय का? देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलला जात आहे का? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची रीत आहे. हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे सध्या 75वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. हिंदुस्थानात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' (ICHR) या संस्थेने 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरुन पंडित नेहरूंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंत्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना बुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. Earthquake in Maharashtra: कोल्हापुरात रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नेहरू, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरुन वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले. ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्रय लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Sanjay raut

  पुढील बातम्या