Home /News /mumbai /

नितीन गडकरींचा 'तो' प्रश्न, शिवसेनेचा मोदी सरकारला थेट सवाल

नितीन गडकरींचा 'तो' प्रश्न, शिवसेनेचा मोदी सरकारला थेट सवाल

गाडय़ा सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही

    मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडली आहे. या मजुरांना घरी जाण्याची घाई आहे, पण घरी जाऊन खाणार काय? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितीत केला होता. त्यांच्या या प्रश्नाची री ओढत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामनामध्ये  'जाणार! जाणार!! जाणार!!! पण जाऊन काय खाणार?' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात आजही राजकारण करणाऱ्या नेत्यांनी फटकारून काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचे आभार माणून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला होता. आजच्या 'सामना'मध्येही गडकरींच्या प्रश्नावरून परप्रांतीयांना गावी सोडण्याचा आग्रह करणाऱ्या भाजप नेत्यांनी खडेबोल सुनावण्यात आले आहे. काय लिहिलंय सामनात? परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही. गाड्या सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही. त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन चला, पण गडकरी म्हणतात त्या प्रश्नाचे उत्तरही शोधा. ‘भावांनो, गावी जाऊन खाणार काय?”  या प्रश्नाचे उत्तर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा द्यायचे आहे. हेही वाचा -लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याला आता 6 फुटांवरून पकडणार पोलीस, VIDEO VIRAL काही मजूर शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले व पोहोचले. त्यातील काहीजण घरी पोहोचण्याआधीच अपघात किंवा अतिश्रमाने मरण पावल्याचे प्रकार क्लेशदायक आहेत. आहात तेथेच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहन जे करतात ते आपापल्या घरी सुरक्षित राहून असे आवाहन करीत असतात. त्यांना या मजुरांचे दु:ख, पायपिटीच्या यातना कशा समजणार? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तेथील सरकारे समर्थ आहेत का? केव्हातरी या स्थलांतरित मजुरांच्या परतण्यासंदर्भात काहीतरी विचार करावाच लागेल. अर्थात, हे सर्व लोक त्यांच्या गावी जातील तेव्हा त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था करायला तेथील सरकारे समर्थ आहेत काय? हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच अडकून पडलेल्या परप्रांतीय किंवा स्थलांतरित मजुरांचा नाही. प्रत्येक राज्यांत असे मजूर अडकले आहेत व त्या राज्यांनी आपली प्रजा पुन्हा आपल्या राज्यात कशी आणता येईल याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेर अचानक पाच-सहा हजार परप्रांतीय मजूर जमतात व शिमगा करतात. त्यांच्यासारख्यांसाठी विशेष गाडय़ा सोडून आणि असा एक एक नग मोजून महाराष्ट्राने त्यांना आपापल्या गावी पाठवायला हवे. या जाणाऱ्यांची नोंद अशी करा की, त्यांनी पुन्हा येथे येण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडता आला पाहिजे. हेही वाचा -दाट लोकसंख्या, प्रचंड गरीबी तरी विकसित देशापेक्षा दक्षिण आशियात कोरोनाचा कहर कमी 'हरिद्वारला अडकलेले गुजरातला आणले, तशीच मदत मजुरांना मिळावी' महाराष्ट्राचे अनेक लोक राजस्थान वगैरे भागात फसले आहेत. हे काही एखाद्याच्या मर्जीने झालेले नाही. एका मजबुरीतून ही परिस्थिती आपल्या सगळ्यांवर ओढवली आहे व त्यातून मार्ग काढायचा आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी सोडायची जबाबदारी अर्थात केंद्राचीही आहेच. रेल्वे गाडय़ा, बसेस, त्यांची सुरक्षा अशी व्यवस्था केंद्राला त्या त्या राज्यांच्या मदतीने करायची आहे. हरिद्वारला अडकलेले 1400 यात्रेकरू सोडविण्यासाठी व त्यांना पुन्हा गुजरातला सुखरूप पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने जी धावपळ केली तीच धावपळ त्यांनी इतर राज्यांत अडकलेल्या लाखो मजुरांसाठीही करावी अशी इच्छा आहे. 'डोकी भडकवून राजकारण करणारे असंतुष्ट आत्मे' मुंबईसारख्या शहरातील लॉक डाऊन इतक्या लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. हे `बंद’ प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार आहे.  या परिस्थितीत परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही. गाडय़ा सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही. पुन्हा त्यांची डोकी भडकवून त्यावर राजकीय भाकऱ्या शेकणारे असंतुष्ट आत्मे आपल्या राज्यात काय कमी आहेत? असा सवाल करत सेनेनं राजकीय नेत्यांना टोला लगावला. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Samana, Shivsena

    पुढील बातम्या