• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • रघुराम राजन यांना पद्धतशीरपणे खोटे पाडले जाईल, सेनेचा भाजपवर निशाणा

रघुराम राजन यांना पद्धतशीरपणे खोटे पाडले जाईल, सेनेचा भाजपवर निशाणा

राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 मे : कोरोना व्हायरसने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे देशापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीचा धागा पकडून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. 'ही शहाणे होण्याची वेळ आहे' या शिर्षकाखाली सामनात आजचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती, या मुलाखतीतील मुद्द्यांना हात घालून मोदी सरकारला सल्लावजा टोला लगावण्यात आला आहे. 'लॉकडाऊनमुळे महसुलात तूट वाढत जाईल आणि राज्य चालवणे कठीण होईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च, शेतकरी कर्जमाफी, अस्मानी-सुलतानी संकटाचा विचार केला तर योजना राबवायच्या कशा? केंद्राचेही तसेच होणार आहे. हिंदुस्थानात यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून कोरोनाच्या संकटानंतर देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. देश पाठीशी उभा राहील. राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे', असं म्हणत सेनेनं भाजपला टोला लगावला आहे. 'रघुराम राजन यांना पद्धतशीरपणे खोटे पाडले जाईल' तसंच, दोन दिवसांपूर्वी  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती. कोरोनामुळे अमेरिकेसारख्या संपन्न देशात बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या एक महिन्यात सव्वाचार कोटी इतक्या नव्या बेरोजगारांची नोंदणी तेथे झाली आहे व या सगळ्यांची व्यवस्था आता सरकारला करावी लागेल. हेही वाचा -बापरे! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 132 साप, गावकऱ्यांनी घाबरून सगळ्यांना केलं ठार अमेरिकेत बेरोजगार भत्त्याची सोय आहे, तशी व्यवस्था आपल्या देशात नाही, पण अमेरिकेस मागे टाकणाऱ्या बेरोजगारांच्या रांगा आपल्याकडेही लागतील व रघुराम सांगतात ते 65 हजार कोटी पाचोळ्यासारखे उडून जातील. हिंदुस्थानात किमान 10 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागेल, असे रघुराम सांगतात व हे धक्कादायक आहे, पण रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे पाडले जाईल व सर्व काही आलबेल आहे, असे ढोलताशे वाजवले जातील. त्याने परिस्थिती बदलणार आहे काय? असा सवाल उपस्थितीत करण्यात आला आहे. 'मध्यमवर्गीय देखील बऱ्यापैकी गरीब होतील' कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन अवस्थेत गोरगरीब भरडला गेला आहे. त्याचे भविष्य अधांतरी आहे. गोरगरीबांना मदत करण्यासाठी सरकारने 65 हजार कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्याचे मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मत, त्यांनी केलेल्या चर्चा याची खिल्ली उडवता येणार नाही. हेही वाचा - PHOTOS : लॉकडाऊनमध्ये 200 किमी अंतरावरून दिसलं हिमालय पर्वतरांगेचं मनमोहक दृश्यं लॉकडाऊनमुळे देशावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. त्यात सगळ्यात हाल होणार आहेत ते गोरगरीबांचे असे रघुराम राजन म्हणतात. मुळात आज जी गरिबीची सरकारी व्याख्या आहे ती लॉक डाऊननंतर बदलणार आहे. स्थिती अशी येणार आहे की, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयदेखील बऱ्यापैकी गरीब होतील व आम्हालाही आर्थिक मागासलेपणाचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी पुढे येईल.' अशी भीतीही या लेखातून वर्तवण्यात आली. 'फाटके आभाळ फक्त एकविचारी लोकांची तुतारी फुंकून शिवता येणार नाही' 'कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून बाहेर कसे पडावे? अर्थव्यवस्था खुली करण्याचे मार्ग कोणते? इत्यादी मुद्यांवर गांधी यांनी चर्चा केली. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अमर्याद काळापर्यंत लॉक डाऊन चालू ठेवणे अर्थव्यवस्थेला महागात पडेल. सरकारला नियमांच्या चौकटी मोडून काम करावे लागेल व सत्ता, निर्णयाचे अधिकार आज आहेत तसे एका दोघांच्याच मुठीत न ठेवता त्याकडे सामुदायिक पद्धतीने पाहावे लागेल. पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण आता आभाळच फाटले आहे. हे फाटके आभाळ फक्त एकविचारी लोकांची तुतारी फुंकून शिवता येणार नाही', असा टोलाही लगावण्यात आला. हेही वाचा -जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, 2 जवान शहीद 'भारत-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी बंद करा' 'अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे अमेरिकेत कमालीचे बदनाम होताना दिसत आहेत. ते फक्त बोलत राहिले, चुकीची विधाने करत राहिले आणि कोरोना पसरत गेला. 60 हजार लोकांनी प्राण गमावले, चार कोटी लोक गरीब झाले व तरीही चीनला धडा शिकविण्याची भाषा मात्र सुरू आहे. हिंदुस्थानात यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. देश पाठीशी उभा राहील. राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे', असा सल्लाही सेनेनं दिलाय. संपादन - सचिन साळवे
  Published by:sachin Salve
  First published: