असा आहे शिवसेनेचा वचननामा, मतदारांसाठी आश्वासनांची खैरात!

असा आहे शिवसेनेचा वचननामा, मतदारांसाठी आश्वासनांची खैरात!

शिवसेनेच्या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होतेय. हे शिवसेना सत्तेत आल्यावर स्पष्टं होईल.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : मातोश्रीवर शिवसेनेकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा यंदा वेगवेगळा जाहीर करण्यात आला आहे. यंदा शिवसेनेनं आधी म्हणेजच निवडणूकपूर्व वचननामा प्रकाशित केला आहे. मातोश्रीवर हा वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे. तर 15 तारखेला भाजपचं संकल्पपत्र जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता हे संकल्प पत्र जाहीर केलं जाईल.

शिवसेनेच्या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होतेय. हे शिवसेना सत्तेत आल्यावर स्पष्टं होईल. दरम्यान, तिजोरीवर किती भार पडणार याचा अंदाज घेऊन वचननामा तयार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार,

कोकणविकास प्राधिकरण स्थापन करणार, बचत गटांच्या महिलांचं सहकार्य घेणार, आरेचा चेंडू सर्वपक्षांच्या कोर्टात यांसह अनेक महत्त्वाचे मुद्दे या वचननाम्यात मांडण्यात आले आहेत.

शिवसेना 'वचननामा' मुद्दे

१) फक्त 10 रुपयांत जेवणाची थाळी.

२) विद्यार्थ्यांना वाहतुकीत विशेष सवलत.

३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.

४) महिला सक्षमीकरणावर भर.

५) कृषी उत्त्पन्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना

६) उद्योग व्यापारासाठी विशेष योजना

७) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना

८) शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना

९) शहरांच्या विकासासाठी विशेष योजना

१०) रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना

इतर बातम्या - पुणे हादरलं! 5 जणांनी धारदार शस्त्राने केले मित्रावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू

दरम्यान, युती असतानाही भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरीही युतीत काही जागांवर मात्र तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मित्रपक्षाने बंडखोरी केलेल्या जागांवर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाहीत. आता तर भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केला आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. ही जागा युतीत भाजपच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेनं या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला AB फॉर्म देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

इतर बातम्या - पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छाता, पाहा VIDEO

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

इतर बातम्या - PMC बँक घोटाळ्यासंबंधी मोठी हालचाल, राज ठाकरे काढणार तोडगा?

Published by: Renuka Dhaybar
First published: October 12, 2019, 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading