मुंबई, 27 जून : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 11 जुलैपर्यंत बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुवाहाटीमधील हॉटेलमधील आमदारांचा मुक्काम वाढला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या बातम्यांनुसार, 30 जूनपर्यंत हॉटेल ब्लू रॅडिसनमध्ये मुक्काम करणार आहेत.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आमदारांना गुवाहाटीमधील मुक्काम वाढला आहे. हॉटेल रेडिसन ब्लू अनिश्चित काळासाठी बुक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. शिंदे गटाकडून हॉटेलचं बुकिंग पुन्हा वाढवल्याची सूत्रांची माहिती हाती आली आहे. 12 जुलै पर्यंत आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच राहणार असल्याची शक्यता आहे. आधी 30 जूनपर्यंत हॉटेलचं बुकिंग होतं. पण आता अनिश्चित काळासाठी हॉटेलचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची (BJP) एण्ट्री झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार बाहेर आले आणि त्यांनी संवाद साधला.
'राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झालं. भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाली, आमची सध्या वेट ऍण्ड वॉचची भूमिका आहे. येणाऱ्या दिवसात जी परिस्थिती निर्माण होईल ती पाहून पुन्हा आमची बैठक होईल. या बैठकीत राज्यातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,' असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Eknath Shinde, Mla, Shivsena