Home /News /mumbai /

बंडखोर आमदार मुंबईत दाखल, भाजप आमदारांसोबत तातडीची बैठक, पुन्हा राजकीय खेळी

बंडखोर आमदार मुंबईत दाखल, भाजप आमदारांसोबत तातडीची बैठक, पुन्हा राजकीय खेळी

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेल्या 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.

    मुंबई, 2 जुलै : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या (Maharashtra Assembly Speaker Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाकडून प्रचंड तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेल्या 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या आमदारांसोबत भाजपचे देखील सर्व आमदार असणार आहेत. हे सर्व आमदार हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचादेखील समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाले आहेत. फडणवीस सर्व 168 आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते उद्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देणार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार आज दुपारी साडेचार वाजता गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले होते. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. (पुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा) त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत. त्यानंतर आता या आमदारांचा मुंबई विमानतळावरुन ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला जाणारा व्हिडीओ समोर आला आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या