मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Shiv Sena Rally Teaser: "शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील फोटो आणि दृश्य" मनसे नेत्याचा दावा

Shiv Sena Rally Teaser: "शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील फोटो आणि दृश्य" मनसे नेत्याचा दावा

"शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील फोटो आणि VIDEO" मनसे नेत्याचा दावा

"शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील फोटो आणि VIDEO" मनसे नेत्याचा दावा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू असतानाच आता मनसेकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे.

मुंबई, 11 मे : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि मनसे (MNS)कडून शिवसेनेला डिवचण्यात येत असताना शिवसेनेकडून आता 14 मे रोजी जाहीर सभेचं (Shiv Sena rally) आयोजन करण्यात आलं आहे. या सभेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप आणि मनसेला चोख प्रत्युत्तर देणार आहेत. शिवसेनेच्या या सभेसाठी एक टिझर लॉन्च करण्यात आला आहे. या टिझरवरुन मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी दावा केला आहे की, शिवसेनेने लॉन्च केलेल्या टिझरमध्ये जे फोटोज आणि दृश्य वापरली आहेत ते राज ठाकरे यांच्या सभेतील आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात एक जाहीर सभा घेतली होती. या सभेतील फोटो आणि दृश्य शिवसेनेने वापरली असल्याचा दावाही गजानन काळे यांनी केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये गजानन काळे यांनी म्हटलं, "असली नकली म्हणाऱ्यानी स्वतःचे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडीओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची... अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की...नकली हिंदुत्ववादी"

गजानन काळे यांनी म्हटलं, शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेने 14 मे रोजीच्या सभेचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. गंमत अशी की, या व्हिडीओत शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो शिवसेनेने आपल्या व्हिडीओत वापरले आहेत. शिवसेनेला नेमकं झालंय काय?

वाचा : राज ठाकरेंसह बाळा नांदगावकरांना धमकीचं पत्र, पत्रातून जीवे मारण्याची धमकी

त्यांनी पुढे म्हटलं, मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता स्वत:च्या सभेसाठी राज ठाकरेंच्या सभेचे फोटो चोरू लागली आहे. अहो.. चोरण्याची सुद्धा हद्द असते. शिवसेनेचा आत्मविश्वास गेला आहे का? शिवसेनेला नैराश्य आलं आहे का?असली नकलीच्या गप्पा मारता मारता आता तुमचं नकली हिंदुत्व उघड पडू लागलं आहे का?

राज ठाकरेंच्या सभेचा आधार आणि मनसेच्या सभेचा आधार घेऊन शिवसेना गर्दी जमवू पाहत आहे. शिवसेनेचं नाव बदलून आता चोर सेना ठेवावं, नकली सेना ठेवावं अशंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: MNS, Shiv sena, Uddhav thackeray