Home /News /mumbai /

VIDEO : शिवसैनिक चवताळले, आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर थेट हल्ला

VIDEO : शिवसैनिक चवताळले, आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर थेट हल्ला

शिवसेनेच्या सत्तेला पाठ दाखवत बंड पुकारुन गुवाहाटीला निघून गेलेल्या आमदारांविरोधात आता शिवसैनिकांच्या मनात रोष निर्माण होताना दिसत आहे.

    मुंबई, 24 जून : शिवसेनेच्या सत्तेला पाठ दाखवत बंड पुकारुन गुवाहाटीला निघून गेलेल्या आमदारांविरोधात आता शिवसैनिकांच्या मनात रोष निर्माण होताना दिसत आहे. मुंबईच त्याचीच प्रचिती येताना दिसत आहे. मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे पक्षाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. यावेळी त्यांनी कुडाळकर यांच्या नावाचं बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडण्यात आला. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी मुंबईत आमदार दिलीप लांडे यांचादेखील बॅनर फाडला. मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंवर टीका दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून टीका केली. "एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. मग सांगा शिंदेंसाठी मी काय कमी केलं? बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा! काही लोक सांगतायत की, माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे. आता मी विठ्ठल आणि इतर बडवे. हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?", अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. (शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई, जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त) "माझ्या कुटुंबीयांवर व मातोश्रीवर ज्यांनी घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मूळं आजही माझ्यासोबत आहे. संजय राठोडांवर अनेक आरोप झाले, विचित्र आरोप झाले. त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं." "माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या