J&K कलम 370: उद्धव ठाकरे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने पूर्ण देश स्वतंत्र झाला...

J&K कलम 370: उद्धव ठाकरे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने पूर्ण देश स्वतंत्र झाला...

देशात पोलादीपणा आहे, हे मोदी यांनी दाखवून दिला आहे. आज खऱ्या अर्थाने पूर्ण देश स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात राज्यसभेत निवेदन सादर केले. यावेळेस त्यांनी जम्मू-काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय देखील सांगितला. यावेळेस त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटवण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. देशात पोलादीपणा आहे, हे मोदी यांनी दाखवून दिला आहे. आज खऱ्या अर्थाने पूर्ण देश स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटवल्याने भारताच्या सर्व बेड्या निघाल्या आहेत. देशाच्या एकसंघपणासाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहन देखील त्यांनी विरोधकांनी केले आहे. जे आदळआपट करतील, त्यांचा सरकार समाचार घेईल. जे विरोध करतील, त्यांचा बंदोबस्त करण्यास सरकार समर्थ आहे.

बाळासाहेब असते तर...

भारताचे इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. काश्मीर हा सदैव आपल्या देशाचा भाग आहे. आपल्या देशाचा प्रश्न आहे, इतर अमेरिकेसारख्या देशांनी नाक खुपसण्याची गरज नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आता पाकव्याप्त नव्हे तर पाकलाचा व्यापले पाहिजे, अशी गर्जनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

मुंबईत शिवेसनेकडून सेलिब्रेशन...

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटवण्याची शिफारसीचे शिवेसनेने स्वागत केले. मुंबईत शिवसेना भवनात शिवेसना नेते आणि कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करून, फटाके उडवून, ढोल ताशे वाजवून सेलिब्रेशन केले. शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटल्यानंतर देशात इतर राज्यात सुरू असलेले सर्व कायदे लागू होणार आहेत. जम्मू-काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला आहे.

VIDEO: मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading