महाराष्ट्रात नवं पर्व : उद्धव ठाकरे यांनी घेेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रात नवं पर्व : उद्धव ठाकरे यांनी घेेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.

  • Share this:

मुंबई 28 नोव्हेंबर : महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. शिवाजी पार्कवर शिवशाहीच्या धर्तीवर प्रंचड व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरच्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नमस्कार केला.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी शपथ घेतली. आघाडीत असलेल्या सर्व पक्षांच्या प्रत्येकी दोन जणांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला. यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे व्यासपीठावर बसले होते. त्यांच्या एका बाजूला धनंजय मुंडे तर दुसऱ्या बाजुला सुनील तटकरे होते.

हा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्य अजेंडा

शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट

कर्ज आणि दुष्काळाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी.

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मदत करणार.

शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळवून देणार.

कृषीमालाच्या योग्य भाव देण्याची हमी देणाक.

गरिबांना शिक्षणा साठी 0% व्याजाने ने कर्ज देणार.

रोजगारामध्ये स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य.

मुलींना मोफत शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य.

सामान्य नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये थाळी.

500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट.

दुष्काळासाठी दीर्घकालीन उपययोजना करणार.

सर्व कार्यक्रम घटनेतल्या तत्वांना आणि धर्मनिरपेक्षतेला धरून असेल.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 28, 2019, 6:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading