'युती'त तडजोड का केली? उद्धव ठाकरेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा!

'युती'त तडजोड का केली? उद्धव ठाकरेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती केली होती त्यामुळे तडजोड केली असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

मुंबई 06 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त काही दिवस राहिले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर पहिल्यांदाच मोठा खुलासा केलाय. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने तडजोड केली असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती केली होती त्यामुळे तडजोड केली असंही त्यांनी स्पष्ट केलं. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केलाय. काही जागांसाठी खळखळ करत बसण्यापेक्षा राज्याचं हित पाहणं महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, यावेळी शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्यात हे खरं आहे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घ्या की यावेळी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडणून येणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने भाजपने आपली अडचण समजून घ्या अशी विनंती केली होती. ती विनंती आम्ही मान्य केली. त्यात फार काही मोठं नाही असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात 'या' नेत्यासाठी पंतप्रधान मोदींची होणार पहिली सभा

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवरही भाष्य केलंय. एकदा युतीचा शब्द दिल्यानंतर काही जागांसाठी खेचाखेची करण्यात अर्थ नाही. नाहीतर एकटं आम्ही कधीही लढू शकतो असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेमुळेच अयोध्या प्रश्नावर चर्चा झाली. देशभर जागृती झाली. आता न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि लवकरच राम मंदिराचं बांधकाम सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

VIDEO : 'आरे'मधल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरे संतापले!

पंतप्रधान मोदींची पहिली सभा साताऱ्यात

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू होणार आहे. भाजपने(BJP) त्यासाठी खास योजना तयार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासह अनेक दिग्गज नेते राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. भाजपचा हुकूमाचा एक्का असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार असून साताऱ्यात होत असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांच्यासाठी ते पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर राज्यात ते सलग तीन दिवस सभा घेण्याची शक्यता असून त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघणार आहे.

अबब...मुंबईत भिकाऱ्याच्या घरात सापडले एवढे पैसे की आकडा ऐकून थक्क व्हाल!

उदयनराजे भोसले यांनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या(NCP) खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा(Stara) लोकसभेची पोटनिवडणुकही होतेय. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली सभा उदयनराजे यांच्यासाठी घेत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9 सभा होणार आहेत.

First published: October 6, 2019, 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading