ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट?

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट?

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्ता कट होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी, अक्षय कुडकेलवार : शिवसेना - भाजप युती होत असताना ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना लोकसभेची तिकीट देऊ नये अशी अट शिवसेनेनं भाजप नेतृत्वापुढे ठेवली. त्याची कुणकुण लागताच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यामुळ लोकसभा निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होणार की काय?अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर हल्ला चढवला होता. त्यामुळे शिवसैनिकांचा प्रचंड राग हा खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी देखील किरीट सोमय्यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या साऱ्याचा फटका किरीट सोमय्यांना बसण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडी पाहता किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

मनसे देखील ईशान्य मुंबईसाठी आग्रही?

मनसे देखील ईशान्य मुंबईसाठी आग्रही असल्याची बातमी आता समोर येत आहे. त्यासंदर्भात मनसेनं राष्ट्रवादीशी बोलणी केल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील चुरस आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

First published: February 18, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading