• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Jitendra Awhad PC: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आहे.

  • Share this:
मुंबई, 23 जून: मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील (TATA Cancer Hospital) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 खोल्या (MHADA 100 flats) देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी-शिवसेनेत (NCP-Shiv Sena) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत तोडगा काढला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, गेल्या महिन्यात टाटा रुग्णांना, नातेवाईकांना मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने 100 घरे देण्याची मान्यता देण्यात आली होती. या निर्णयाला काल टाटा कॅन्सर रुग्णांना म्हाडा घरांना स्थगिती देण्यात आली. स्थानिक आमदारांनी याला नकार दिल्यानंतर या घरांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आता बॉम्बे डाईंगमध्ये 100 घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'आपल्या आमदारासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय वाखण्याजोगा, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकी आधी मला बोलावून जागा त्याच परिसरात जागा शोधण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर आता बॉम्बे डाईंगमध्ये 100 घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाची घरे कोणाला,कोणाच्या हातातून द्यायची आहेत हे मुख्यमंत्री यांना विचारूनच निर्णय घेतला होता असंही आव्हाडांनी सांगितले आहे. म्हाडाची घरे कोणाला, कोणाच्या हातातून द्यायची आहेत हे मुख्यमंत्री यांना विचारूनच निर्णय घेतला होता. मला आनंद आहे आज स्थगिती मिळून लगेच तेवढ्याच जागा मिळाल्या. माझ्यावर कोणाचाही राग नाहीये असंही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published: