मुंबई, 05 नोव्हेंबर : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आज नारायण राणेंनी शिवसेनेवर विखारी टीका केली होती. पण, राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, नंतर काँग्रेसशी गद्दारी केली, आता भाजपशी बेईमानी करुन कुठे जाणार? असा सणसणीत टोला विनायक राऊत यांनी राणे यांना लगावला.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देत विनायक राऊत यांनी राणेंला खडासवाल केला.
नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी करून ते भाजपमध्ये गेलेत. उद्या ते भाजपशीही बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जातील, असा सणसणीत टोला विनायक राऊत यांनी राणेंना लगावला.
दिवाळीदिवशी शोककळा! फटाक्यांच्या स्फोटात बापलेकाचा मृत्यू, पाहा VIDEO
तसंच, आजपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कुणी केली नसेल. त्यामुळे राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी राणेंना फटकारून काढलं.
काय म्हणाले होते राणे?
नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi Government) सरकारवर टीका केली.
T20 World Cup : ...म्हणून मी विराटवर जळतो, अश्विनने केला खुलासा, VIDEO
'तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली. मीडियाने काही लोकांना सांभाळून घेतलं. मोदी सरकार बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते माहीत नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे, अशी टीका राणेंनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.