मुंबई, 06 जानेवारी : PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
वर्षा राऊत यांना आज ईडीने एक समन्स बजावले आहे. यात वर्षा राऊत यांना चौकशीसाठी 11 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. याआधी वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी ईडीने समन्स बजावले होते.पण, त्याआधीच म्हणजे 4 जानेवारी रोजी वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. खुद्ध वर्षा राऊत यांनीच ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सहकार्य केले होते. चार तास त्या या ईडी कार्यालयातच होत्या. परंतु, त्यांच्याकडे कोणतीही चौकशी करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली.
धक्कादायक, पोलीस स्टेशनच्या आवारातच गळफास घेऊन एकाची आत्महत्या
विशेष म्हणजे, ईडीने याआधीही वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते. परंतु, त्यांनी मुदतवाढ घेऊन चौकशीला हजर राहण्यास टाळले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे वर्षा राऊत या यावेळी चौकशीला हजर राहणार की नाही आणि राहिल्याच तर त्यांची चौकशी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
पती अंघोळ करत होता अन् चोर घुसले घरात, 20 तोळे सोने आणि दीड किलो चांदी केले साफ!
मध्यंतरी, ईडीने या प्रकरणाशी संबंधीत एक खुलासा केला होता. 'संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी 5625 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण 12 लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.