महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, जनतेच्या मनाप्रमाणेच होईल- संजय राऊत

महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, जनतेच्या मनाप्रमाणेच होईल- संजय राऊत

महाराष्ट्रातील राजकीय 'ग्रहण' लवकरच निवळणार असून महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, विशेष म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर: राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष हा गोंधळ नसून ही न्याय आणि सत्याची लढाई आहे. महाराष्ट्रातील राजकीय 'ग्रहण' लवकरच निवळणार असून महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाप्रमाणेच निर्णय होईल, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल. संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली आहे. शिवसेनेचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमिवरच शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वत: आम्हाला राज्यापालांकडे पाठवले होते. राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, काय घडतंय पडद्यावरचं आणि पडद्यामागचं हे राज्यपालांना सांगणे शिवसेनेचे कर्तव्यच असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

-सरकार लवकर स्थापन होईल

-मुख्यमंत्री सेनेचा होईल

- सर्व पक्षाची नेते प्रयत्न करत आहेत.

-अपक्षांची भूमिका आता महत्त्वाची आहे.

- महाराष्ट्रचा निर्णय हा महाराष्ट्रात होईल.

-महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे, ही पवारांची आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे.

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवं आहे.

- दिल्लीत काय झालं मला माहीत नाही.

- 'तरुणभारत'वर प्रतिक्रिया..

-टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार

- पक्ष प्रमुख ना खोट ठरवलं जात आहे जे ठरलं होतं यावर कोणी बोलत नाही.

-कोणीही टीका करू दे , जनतेला सर्व माहीत आहे.

- शरद पवारांसोबत आता काही बोलणं नाही. पण जर बोललो तर अपराध आहे का? जे कोणी पवारसाहेब सोबत बोलत आहेत, हे आम्हाला माहीत आहे. फक्त आम्ही बोललो की दिसतं.

- कालची फाईल, यात काय होत, हे सर्वांना माहीत आहे.

- शपथ ग्रहण होईल, आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे, ते सुटेल.

- महाराष्ट्र राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे.

पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जात आहे..

भाजपकडून दिलेला शब्द पाळला जात नाही, त्यावर प्रथम बोलावे. शिवसेना पक्षप्रमुखांना खोटे ठरवले जात आहे. मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. जे ठरलं होतं यावर कोणी बोलत नाही. कोणीही टीका करु दे, जनतेला सर्व माहीत आहे. सत्ता सगळ्यांना हवी आहे. सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. अपक्षांची भूमिका आता महत्वाची असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवारांशी संवाद साधणे, हा अपराध आहे का?

शरद पवारांसोबत आता काही बोलणं झालं नाही. पण जर बोललो तर हा अपराध आहे का? असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावे हे पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवे आहे. दिल्लीत काय झाले ते माहीत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. जे कोणी पवारसाहेबांसोबत बोलत आहेत, हे आम्हाला माहीत आहे. फक्त आम्ही बोललो की दिसते, असेही संजय राऊत यांनी टोला लगावला.

फडणवीसांचा उल्लेख केला 'मावळते मुख्यमंत्री'

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ घेत दिल्ली गढूळ, महाराष्ट्र स्वच्छ, पुढचे पाऊल कधी? असा सवाल विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या म-हाटी जनतेसाठी महत्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेऊन राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे असं म्हणत भाजपवर टीका केली. नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं 'कौल' दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल असं म्हणताना फडणवीसांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री करण्यात आला.

VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!

Published by: Sandip Parolekar
First published: November 5, 2019, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading