...तर काळ्या चड्डया घालून तेव्हा आंदोलन करायचं होतं, संजय राऊत यांची भाजपवर टीका

...तर काळ्या चड्डया घालून तेव्हा आंदोलन करायचं होतं, संजय राऊत यांची भाजपवर टीका

आज तर आकाशात काळे कावळेही दिसले नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी या भाजची खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे: राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ असल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत भाजपनं शुक्रवारी 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' पुकारलं आहे. यात 'माझं अंगण रणांगण' अशी घोषणा देत पक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेरच फलक, काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा.. शिवसेनाप्रमुखांच्या मुशित तयार झालेला नेता हरपला, शशिकांत पाटकर यांचं निधन

विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यानं ते आंदोलन करत आहे. भाजपचं हे आंदोलन पूर्णतः फसलं आहे. केवळ भाजप नेत्यांचं हे आंदोलन आहे. जनता यात सामील झाली नाही. आज तर आकाशात काळे कावळेही दिसले नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी या भाजची खिल्ली उडवली आहे. एवढंच नाही तर भाजपला आंदोलन करायचं होतं तर त्यांनी मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवल्यानंतर काळ्या चड्डया घालून आंदोलन करायला हवं होतं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. आंदोलन अपयशी ठरल्यानं भाजप नेत्यांचा जळफळाट होत असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, ठाकरे सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आहेत. भाजपच्या टीकेला काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या निमित्ताने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार त्या प्रश्नांना सामोरे जात आहे. राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी प्रश्न सोडवण्याच्या कामात सरकारला सहकार्य करायला हवं, असं संजय राऊत म्हटलं आहे.

हेही वाचा... आदित्य ठाकरे भाजपच्या राजकारणाला म्हणाले Shameful

राज्यपालांच्या 'अंगणात' लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा करायला हवी. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. विरोधी पक्षाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळ्यांचे वैफल्य येणे साहजिकच आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

First published: May 22, 2020, 4:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading