Home /News /mumbai /

औरंगजेब प्रिय असेल तर कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत, संजय राऊतांचा थोरातांना टोला

औरंगजेब प्रिय असेल तर कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत, संजय राऊतांचा थोरातांना टोला

औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात?

    मुंबई, 17 जानेवारी : 'भारताची राज्यघटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला (aurangzeb) तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? असं म्हणत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय आखाडा तापला आहे. काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामकरणाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला चिमटा काढला आहे. भीषण! बसमध्ये करंट लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू 'औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच' असं राऊत यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितले. तसंच, आक्रमक मोगल हा ‘सेक्युलर’ वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला होता, असं सांगत संजय राऊत यांनी संभाजीराजे यांच्या वधाचा संपूर्ण घटनाक्रमच काँग्रेसला ऐकवला. IPL 2021 : आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर लागणार मोठी बोली! ' औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱ्हेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता. त्याच्या हिंदूविरोधी आक्रमणामुळे हिंदू सैरभैर झाले व जाटांनी बंडे केली. औरंगजेबाने ती निर्घृणपणे मोडून काढली. छत्रसाल बुंदेला व सतनामी यांनी औरंगजेबाच्या हिंदूविरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला, पण सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने तो मोडून काढला. शिखांचे गुरू तेगबहादूर यांनीही औरंगजेबाच्या धोरणास विरोध केला. शीख गुरूंनी मुसलमान धर्म स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून या शूर शीख गुरूंनाही ठार करण्यात आले. संतापलेल्या शिखांनी 1675 मध्ये औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा औरंगजेबाने जोधपूरचे राज्य खालसा करण्यासाठी अजितसिंग व त्याच्या राण्यांना कैद करून ठेवले. औरंगजेब हा परधर्मद्वेष्टा होता असे म्हणायचे ते याचसाठी. तो मर्‍हाटा, शीख, जाट, राजपूत सगळ्यांचा द्वेष करीत होता. त्याचे संबंध इराण, बुखारा, मक्का, बाल्ख या प्रांतांतील मुसलमान राजांशी होते. त्याला सर्व हिंदू राजांना खत्म करून धर्माच्या आधारावर स्वतःची बादशाही निर्माण करायची होती, पण छत्रपती शिवाजीराजांसारखे मोजके योद्धे औरंगजेबाला स्वस्थता लाभू देत नव्हते' असंही राऊत यांनी काँग्रेसला सांगितले. गाडीला धडक दिली म्हणून चापट मारली, महेश मांजरेकरांचा VIDEO व्हायरल 'महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. 1679 मध्ये त्याने जिझिया व इतर अनेक कर हिंदूंवर लादले. हिदूंचे उत्सव, धार्मिक क्रतवैकल्ये, पूजाअर्चा यावर निर्बंध आणले. औरंगजेब धर्मांध होता. त्याला हिंदुस्थानात फक्त इस्लाम धर्मच ठेवायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे', असा सणसणीत टोलाही राऊत यांनी काँग्रेसला लगावला.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या