आणीबाणीच्या दिवसाला 'काळा दिवस' म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही- संजय राऊत

आणीबाणीच्या दिवसाला 'काळा दिवस' म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही- संजय राऊत

  • Share this:

मुंबई,24 नोव्हेंबर: भाजपला मी राजकारणातील व्यापारी समजत होतो. परंतु, भाजपने हा व्यापार सचोटीने केला असता तर त्यांच्यावर आता 'दर दर के ठोकरे' खाण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. देशाचे नेते आहेत. शरद पवारांचा पक्ष फोडून भाजपने रातोरात सरकार स्थापन केले. अजित पवार यांना फोडणं हा भाजपचा शेवटचा डाव होता आणि आता तो भाजपवरच उलटला आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी दावा केला.

कालचा दिवस हा काळा दिवस होता. यापुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या दिवसाला काळा दिवस म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू खासदार संजय काकडे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतला, त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

- आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 24 तासाचा वेळ दिला जातो. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करायला 30 तारखेपर्यंत वेळ दिला.

- बहुमत आहे तर एवढा वेळ कशासाठी घेत आहेत.

- फोडाफोड करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली का?

- भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला.

- भाजपने सचोटीने व्यापार करायला हवा होता. व्यापार प्रामाणिकपणे केला असता तर भाजपला अशी 'दर-दर की ठोकरे' खाण्याची वेळ आली नसती.

- भाजपने राष्ट्रपती भवन आणि राजभवनात काळाबाजार केला.

- या देशात खालच्या स्तरावर राजकारण केले जात आहे, याचं उदाहरण काल पाहायला मिळाले.

- बहुमत होते तर चोरुन शपथविधी का केला?

- तीन -पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचं बहुमत असल्याचं त्यांनी सांगितलं.

- राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले.

- अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला.

- अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपनं बाहेर यावं, असेही राऊत यावेळी म्हणाले.

- आम्ही घाबरणारे नाहीत. हा त्यांचा शेवटचा खेळ आहे. आता त्यांचा खेळ संपला.

- अजित पवारांनी मोठी चूक केली. त्यांचा पक्ष फोडणे हे नैतिक नाही.

- भाजपला काहीही फायदा होणार नाही.

- सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स, पोलीस हे चार त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. हे चार खेळाडू आणि राष्ट्रपती आणि राजभवन तर राखीव खेळाडू आहेत. या चौघाच्या जीवावर त्यांना जेवढा हैदोस घालायचा आहे तेवढा घालू द्या. या राज्याची जनता त्यांना भीक घालणार नाही.

-राज्यपाल आम्हाला एक न्याय देतात आणि भाजपला वेगळा न्याय देतात, असा आरोप देखील त्यांनी केला. आमच्या आमदारांना आता 10 मिनिटात जरी बहुमतासाठी बोलावले तरी आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो.

Published by: Sandip Parolekar
First published: November 24, 2019, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading