Home /News /mumbai /

आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदारांपाठोपाठ एका खासदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित महत्त्वाची मागणी केली आहे. या मागणीमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढील दबाव वाढताना दिसत आहे.

    मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) सरकारमध्ये न राहता भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करावं, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनानंतर अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे जवळपास 40 पेक्षाही जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. आमदारांच्या या मागणीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील दबाव वाढला आहे. या सगळ्या घडामोडी ताज्या असतानाच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत भाजपसोबत हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. भावना गवळी यांनी पत्रात अप्रत्यक्षपणे त्याबाबतच भाष्य केलं आहे. भावना गवळी नेमकं काय म्हणाल्या? "आपल्या सेवेशी नम्रपणे विनंती करते की, सध्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठं आव्हा असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनात याची खंत आहे", असं भावना गवळी म्हणाल्या. (मुख्यमंत्र्यांचं Live अर्धा तास खोळंबल्यानंतरही पेच कायम, आता शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष) "आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा, ही विनंती", असं आवाहन भावना गवळी यांनी केलं. भावना गवळी यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांना अनेकवेळा ईडीने समन्स बजावले आहेत. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागेदेखील ईडीचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे त्यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपसोबत हातमिळवणी करण्याची विनंती केली होती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या