Home /News /mumbai /

'आमचा बाप दिल्लीचा' विरोधी पक्षाची ही भूमिका कितपत योग्य? शिवसेनेचा रोखठोक सवाल

'आमचा बाप दिल्लीचा' विरोधी पक्षाची ही भूमिका कितपत योग्य? शिवसेनेचा रोखठोक सवाल

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला आहे.

    मुंबई, 27 जुलै: कोकणात आलेल्या महापुरानंतर (Konkan flood) राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही (Opposition leaders) पूरग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे, केंदारकडून काय आणायचे ते आणा स्वागतच आहे. जोरदार पावसामुळे पूरग्रस्त भागात मदतकार्यात अडथळे निर्माण झाले, पण या अडथळ्यांतून सरकारी यंत्रणा मार्ग काढत असताननाच राजकीय पर्यटनाने यंत्रणेलाच धारेवर धरायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि माजी मंत्री महाजन हे धावाधाव करत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळ्या खाव्या लागल्या आणि सरकारी यंत्रणेला होड्या वगैरे घेऊ त्यांना वाचवावे लागले असं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे. काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचे जाहीर कौतुक मात्र सत्कार करण्यास दिला नकार, कारण... नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, आम्ही पहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांचे हे विधान समजदार नेत्याचे नाही, पण आम्ही ते चांगल्या अर्थाने घेतो. नुकसानग्रस्तांना, पूरग्रस्तांना सर्वतोपरी केंद्र सरकार मदत करेल असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करावे का? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे, केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण राज्याच्या लोकनियुक्त सरकारला आम्ही मानत नाही ही भूमिक राज्याच्या हिताची नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारविषयी तक्रारीचा सूर लावलेला नाही. असे असतानाही, 'आमचा बाप दिल्लीचा' ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेणे कितपत योग्य आहे?
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Shiv sena

    पुढील बातम्या