मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"....तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते"

"....तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते"

"....तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते"

"....तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते"

Shiv sena saamana editorial: महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुखांचे धोरण होते.

मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana editorial) माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण आज आपण करत आहोत. देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, आज शिवसेनाप्रमुख हवेच होते असे जनतेला प्रकर्षाने वाटते असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

... तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्काम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. 'मातृभूमी'ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर 'लेक्चर' देतात. तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे. एक योद्धा शिवतीर्थावरुन बळ देत आहे, ते महायोद्धाच होते.

लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते

अग्रलेखात पुढे म्हटलं, संकटाची वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले झाले. हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली. त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्यांकांनी आंदोलने केली. त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुमा एका रझा अकादमी नामक इस्लामी संखटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला.

वाचा : कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार, औरंगाबादमध्ये 10 हजारात मिळतायत डमी रुग्ण

बाळासाहेब असते तर...

रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्याची बंदची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते. उत्तरप्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमानांत दंगली घडविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. तुमचे राजकारण तुमच्या राज्यात. त्यासाठी महाराष्ट्र का पेटवला, हाच प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी चाबूक कडाडल्यासारखा विचारला असता असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, "होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भाकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच 'तारे'त बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत, भगतसिंगांपासून चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते." असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Sanjay raut, Shiv sena