Home /News /mumbai /

शिवसेनेच्या आमदाराने BMC च्या कंत्राटदाराला बसवले नाल्यात, टाकला अंगावर कचरा, LIVE VIDEO

शिवसेनेच्या आमदाराने BMC च्या कंत्राटदाराला बसवले नाल्यात, टाकला अंगावर कचरा, LIVE VIDEO

जनतेचा त्रास कंत्राटदाराला कळवा म्हणून आपण असं कृत्य केलं, असं दिलीप लांडे यांनी सांगितलं.

     मुंबई, 13 जून: पहिल्याच पावसात मुंबईची (Mumbai Rain) तुंबई झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची एकच झोड उठवली आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे.  चांदिवलीचे  (Chandiwali) शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी चक्क कंत्राटदाराला नाल्यात बसवून अंगावर कचरा टाकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नालेसफाईवरून शिवसेनेचेच आमदार आक्रमक झाले आहेत. चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी आक्रमक होत चक्क पालिकेच्या कंत्राटदारालाच नाल्यात लोळवलंय. चांदिवलीतील संजय नगर भागात मोठ्या प्रमाणात नाले तुंबलेले होते. या बाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि ही नालेसफाई सुरू केली. मात्र, या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते. त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी त्याला चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले. एवढंच नाहीतर शिवसैनिकांनी या कंत्राटदाराच्या अंगावर कचरा सुद्धा टाकला. जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल, घालावी लागते वेणी जनतेचा त्रास कंत्राटदाराला कळवा म्हणून आपण असं कृत्य केलं, असं दिलीप लांडे यांनी सांगितलं. मात्र, यामुळे एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदाराला कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसविण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Rain updates

    पुढील बातम्या