सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी, ईडीने बोलावले

सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी, ईडीने बोलावले

प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

ठाणे, 25 नोव्हेंबर : शिवसेनेचे (Shivsena)  आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांच्या घरावर अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED)छापे मारले आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी

प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.  सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र हादरला, बीडमध्ये पाटबंधारे विभागात पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे.

दरम्यान, ईडीने छापे टाकण्याआधी आपल्याला कोणतीची नोटीस दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली होती. सोमवारी संध्याकाळी ते मुंबई आले होते, त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.

संजय राऊत भाजपवर भडकले

'केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. CBI, ED काही असू द्या, आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडे दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो' असं राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले.

पहिल्यांदा स्टेअरिंग घेतलं हातात तेच ठरलं अखेरचं, गाडी दरीत कोसळून जागीच मृत्यू

'तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही' असंही राऊत म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 10:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या