शिवसेनेच्या आमदारांचा मढ बीचवर Enjoy.. कार्यकर्त्यांसोबत घेतला सेल्फी!

शिवसेनेच्या आमदारांचा मढ बीचवर Enjoy.. कार्यकर्त्यांसोबत घेतला सेल्फी!

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेले मतभेद अगदी टोकाला पोहोचले आहेत.

  • Share this:

मुंबई,9 नोव्हेंबर: महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेले मतभेद अगदी टोकाला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी पाहिल्या तर सगळ्यांचे लक्ष राजभवनाकडे लागले आहेत. सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटताना दिसत नाही आहे. यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेनेचे आमदार मढ बीचवर घेताय सेल्फी..

शिवसेनेचे आमदार मढ बीचवर पोहोचले असून ते एन्जॉय करताना दिसत आहे. प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील सध्या बिचवर आनंद घेत आहेत. आमदारांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही घेतल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शिवसेनेने शुक्रवारी आपल्या आमदारांना रंगशारदा हॉटेलमधून बाहेर काढून मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये हलवले. रिट्रीट हॉटेल हे थ्री स्टार रिसॉर्ट असून सगळ्या आमदारांना एकत्रितपणे बैठक घेता येईल. येथे कॉन्फरन्स हॉलही आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांची एकत्र बैठक घेऊ शकतात, अशी व्यवस्था येथे आहे.

कसं आहे रिट्रीट हॉटेल..

- थ्री स्टार हॉटेल

- बैठकीसाठी कॉन्व्हेंशन सेंटर

- मोठाले स्विमिंग पूल

-700 लोकांना राहता येईल इतक्या प्रशस्त खोल्या

- वॉटर पोलो, बिलियर्ड्स, टेबल टेनिसची व्यवस्था

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीला गेले आहेत. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलवली आहे. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार बैठक झाली. बैठकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती सोनिया गांधी यांना देण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील राज्यातील सर्व नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस, शिवसेनेला समर्थन देणार का, याबाबत सोनिया गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यात काय चर्चा होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading