('बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा) दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या गुवाहाटीत दाखल झाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. शिंदे गटाची एक अपेक्षित संख्या पूर्ण होणार आहे. त्यांच्या गोटात सकाळपासून 35 आमदार दाखल होते. केसरकर जेव्हा आले तेव्हा तो आकडा 35 झाला होता. पण त्यांना 37 आकड्यांची प्रतीक्षा होती. आता दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या जाण्याने शिंदे गटाचा 37 आकडा पूर्ण झाला आहे. तर 9 अपक्ष आमदार आहेत. शिंदे गटाला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 37 आकड्यांची आवश्यकता होती. तो आकडा या गटाने पार केला आहे.#WATCH Few more Shiv Sena MLAs from Maharashtra arrive in Guwahati, now en route to Radisson Blu hotel#Assam pic.twitter.com/Lmbs96gREm
— ANI (@ANI) June 23, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करु शकतात. ते राज्यपालांना त्या संदर्भातील माहिती फॅक्सद्वारे देऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर रातोरात निर्णय होऊ शकतो. कारण दोन आमदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्यांच्या स्वाक्षऱ्या नंतर रात्रभरात पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदेंना जावून मिळाले #shivsena #eknathshinde #MaharashtraCrisis #DadaBhuse pic.twitter.com/Yt1EBU6v9d
— News18Lokmat (@News18lokmat) June 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena