Home /News /mumbai /

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकावर अंकूश ठेवण्यासाठी प्रतिरुपमंत्रिमंडळाची म्हणजेच शॅडो कॅबिनेटची घोषणा केली असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलं.

  मुंबई 09 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचा 14वा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमात शॅडो कॅबीनेट संदर्भात महत्वाची घोषण करण्यात आली. राज्य सरकारच्या कामकाजावर  अंकूश ठेवण्यासाठी प्रतिरुप मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. नेते आणि पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारला विरोधासाठी विरोध नाही तर विधायक सूचना करण्यासाठी वचक ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ काम करेल असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मनसेच्या या निर्णयावर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मनसेनं विधायक सूचना करण्यसाठी जर हे केलं असेल तर त्यांच्या सूचनांचा आम्ही विचार करू. मात्र राजकारणासाठी हे काम असेल तर मात्र आम्ही त्याला महत्त्व देणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री आणि नेत अनिल परब यांनी व्यक्त केली.राज्याच्या विकासासाठी जे कुणी विधायक सूचना करतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही त्याचा विचार करू आणि त्या घेता येतील का ते पाहू मात्र विरोधासाठी विरोधाला किंमत देत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'मनसे'च्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा आज झाली. राज्य सरकावर अंकूश ठेवण्यासाठी प्रतिरुपमंत्रिमंडळाची म्हणजेच शॅडो कॅबिनेटची घोषणा केली असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलं . ते म्हणाले, 14 वर्ष झाली, प्रवास सुरु आहे, ह्यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. 

  हे वाचा - 'मनसे'च्या शॅडो कॅबिनेटची घोषणा, अशी आहेत नेत्यांची नावं

  काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेंव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? इतक्या चढ उतारानंर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला आनंद झाला आहे असंही ते म्हणाले. प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असंही त्यांनी सांगितलं. सरकारवर वचक ठेवण्यासाठी आणि विधायक काम करण्यासाठी हे मंत्रिमंडळ आहे. हे वाचा - अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार यात कुणी परस्पर निर्णय घेऊन माध्यमांना सांगू  नये, कारण नसताना वाभाडे काढू नका, कुणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला. काही लोक RTIचा वापर फक्त ब्लॅकमेल करण्यासाठीच करत असतात अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Raj Thackeray

  पुढील बातम्या