मोठी बातमी, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्द

मोठी बातमी, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची आज शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आढळून आली आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री  अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. आज सकाळी त्यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागली आहे.  त्यामुळे अनिल परब यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  कोरोनाच्या परिस्थितीत अनिल परब यांनी संपूर्ण खबरदारी घेत आपले कार्य नियम पार पाडत होते. याच भेटीगाठी दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन परब यांनी केले आहे.

आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना खरमरीत पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची आज शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केली आहे.

दरम्यान,  राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात वाद पेटला आहे.

'ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला. संपूर्ण देश हिंदुत्वमय केला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे हे सुपूत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये, त्याचे धडे देऊ नये. आमचे हिंदुत्व पक्के आहे' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

कोरोनाबद्दल चिंता व्यक्त मोदींनी दिला संपूर्ण महाराष्ट्राला नवा नारा, म्हणाले...

'राज्यपाल यांनी  मुख्यमंत्र्यांना इंग्रजी भाषेत पत्र पाठवले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी मराठीतून आणि ठाकरी भाषेत उत्तर दिले आहे.  उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर हे ऐतिहासिक दस्तावेज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला आणि राज्यपालांना कोणतेही आकाडतांडव न करता अत्यंत शालिनतेनं हिंदुत्वाच्या घटनांचे पालक करून उत्तर दिले आहे' अशा शब्दांत राऊत यांनी सेनेची भूमिका ठामपणे मांडली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 13, 2020, 2:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading