बंडोबांना थंड करण्यासाठी शिवसेनेचा हा आहे 'मास्टर प्लान'

बंडोबांना थंड करण्यासाठी शिवसेनेचा हा आहे 'मास्टर प्लान'

युतीच्या घोषणेला वेळ होत असल्याने वेळेवर घाई होऊ नये म्हणून AB फॉर्म्सचं वाटप सुरू करण्यात आलं होतं. मात्र बंडखोरीची शक्यता असल्याने वाद टाळण्यासाठी त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई 30 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजपचं जागावाटप निश्चित झाल्याने शिवसेनेने निश्चित केलेल्या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप केलं. मातोश्रीवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी महत्त्वांच्या उमेदवारांना AB फॉर्म दिलेत. तर काही फॉर्म्स हे स्थानिक नेत्यांकडे दिलेत. मात्र असे फॉर्म्स दिल्याने बंडखोरीची शक्यता असल्याने AB फॉर्म देणं थांबविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. युतीच्या घोषणेला वेळ होत असल्याने वेळेवर घाई होऊ नये म्हणून AB फॉर्म्सचं वाटप सुरू करण्यात आलं होतं. काही निवडणुकींमध्ये उमेदवाराला वेळेत AB फॉर्म न मिळाल्याने त्याला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता अशा घटना घडल्या होत्या.  आता 2 आणि 3 ऑक्टोंबरला AB फॉर्म उमेदवारांना दिले जातील. जेणे करून बंडखोरांना बंडखोरी करण्यासाठी वेळ मिळू नये यासाठी शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे.

कसा आहे आदित्य ठाकरेंच्या 'वरळी' मतदारसंघाचा इतिहास?

करमाळा मतदारसंघातील बंडाळी थोपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधून आलेल्या रश्मी बागलासंदर्भात सेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. त्या आज सकाळपासून मातोश्रीवर होत्या. मात्र त्यांना  रिकाम्या हातानं परत जावं लागलं. उध्दव ठाकरेंनी 2 ऑक्टोंबरला परत येण्यास सांगितल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. विद्यमान शिवसेना आमदार नारायण आबा पाटीलांनी मातोश्रीवर  रश्मी बागल यांना विरोध केला होता.

'महायुती'ची घोषणा झाली, मात्र ती कागदावरच

गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं चर्चेचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. कारण युतीची घोषणा फक्त पत्रक काढून करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवातही केली होती, पण घोषणा व्हायची बाकी होती. ती सोमवारी संध्याकाळी निव्वळ पत्रक काढून करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळलं. त्यामुळे कोणाला कुठली जागा मिळणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे स्पष्ट झालेलं नाही.

उपमुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं हे उत्तर!

शिवसेनेचे सुभाष देसाई आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या सहीने हे महायुतीची घोषणा करणारं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. भाजप, सेना. रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयतक्रांती यांची ही महायुती असेल, असं या पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. युतीचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोण किती जागा लढवणार हे लवकरच जाहीर करण्यात होईल, असाही उल्लेख या निवेदनात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 30, 2019, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading