Home /News /mumbai /

यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

 यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53  झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे.

यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे.

यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे.

    मुंबई, 14 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि  मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे.  यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53  झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने  या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली. यात काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला आहे.  काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केले. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात एक मध्यस्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली होती. यासाठी रोखीने पैसे स्वीकारल्याची त्या ज्वेलर्सने कबुली दिली आहे. (उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यांचा वापर करणं टाळा, अन्यथा होतील 'हे' दुष्परिणाम) बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे. तसंच कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.  एकूण संपत्तींची संख्या आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीत दडलंय काय? दरम्यान, याआधी यशवंत जाधव यांच्याशी संबंधीत एक दोन ठिकाणी नाही तर तब्बल 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. ज्यात जवळपास 1 कोटी रुपये रोख आयकर विभागाला आढळल्याचे बोलले जात आहे. शिवाय बेनामी संपत्तीचे कागदपत्रे, काही महत्वपुर्ण कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन, प्रिंटर, स्कॅनर, सरकारी दस्तावेज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंदी केलेली डायरी आयकर विभागाला धाडीत सापडली आहे. या डायरीत नेमकं दडलय काय? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या