भाजपचं टेंशन वाढणार; उद्धव ठाकरेंकडे बहुमताची यादी तयार, संजय राऊतांचा दावा

भाजपचं टेंशन वाढणार; उद्धव ठाकरेंकडे बहुमताची यादी तयार, संजय राऊतांचा दावा

'धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू.'

  • Share this:

मुंबई 3 नोव्हेंबर :विधानसभेचे निकाल लागून आता 9 दिवस होताहेत मात्र सत्ता स्थापनेची शक्यता अजून दिसत नाहीये. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर अडीचवर्ष मुख्यमंत्रीपद हवच अशी शिवसेनेची भूमिका असल्याने सत्तास्थापनेचा गाडा 'वाटणी'च्या रस्सीखेचात फसला आहे. धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्यांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले आहेत असंही त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

प्रियंका गांधी यांचा फोन झाला हॅक, काँग्रेसनेच केला खळबळजनक खुलासा

'सामना'मधूनही संजय राऊत भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. 'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. काही दिवसांत शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल,' असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला 'हा' शब्द

'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रिपदावरच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही. चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरियाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही?' असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या