राज्यपालांकडून राज्यघटनेची हत्या, संजय राऊत यांची खोचक टीका

राज्यपालांकडून राज्यघटनेची हत्या, संजय राऊत यांची खोचक टीका

'सत्यमेव जयते' हा या देशाचा नारा असून सत्याचाच विजय होईल.

  • Share this:

मुंबई,26 नोव्हेंबर:शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर शरसंघान साधले आहे. भाजपकडून राज्यपालांना खोटं पत्र दाखवण्यात आले. राज्यपालांकडून राज्यघटनेची हत्या केल्याचा आरोपही राऊतांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका, असा भाजपला इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, 'सत्यमेव जयते' हा या देशाचा नारा असून सत्याचाच विजय होईल. बहुमताची आम्हाली भीती वाटत नाही. आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीचे सर्व 51 आमदार परतले आहेत. महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा केला. नारायण राणे काहीही बोलतील. राज्यात अनेक खोटारडे लोक फिरत आहेत, असा टोला लगावला. एकनाथ शिंदे ह शिवसेनेचे विधिमंडळनेते आहेत तर विधिमंडळनेतेपदी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनाच सर्व आधिकार आहेत.

अजित पवारांनी मोठं क्रांतिकारी...

अजित पवारांनी मोठं क्रांतिकारक कार्य केले आहे, त्या जागतिक नेत्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी आपला निर्णय देणार आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये '162 अ‍ॅण्ड मोर..जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच' असे म्हटले आहे. त्याचबरोबर शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे. भाजपच्या ऑपरेशन 'लोटस'वर खोचक टीका केली आहे. तर काळजी नसावी, असे सांगत राज्यातील जनतेला सूचक संकेतही देण्यात आले आहेत.

या भाजप नेत्यांना म्हटले 'चांडाळ चौकडी'

'महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा बाजार सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांनी मिळून 162 आमदारांचे पत्र सादर केले. हे सर्व आमदार राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली? फडणवीस सरकारकडे बहुमत होते तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली? आम्हीही त्यांना सांगतो कितीही 'फिक्सींग' झालं तरी 'सत्यमेव जयते' या ब्रिदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही.'' भाजपकडून सुरू असलेल्या ऑरेशन लोटसवर शिवसेचं मुखपत्र सामनामधून जोरदार निशाणा साधण्यात आला.

ऑपरेशन लोटससाठी भाजपने ज्यांच्यावर ही जबाबदारी टाकली ते सर्व नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. हे दिग्गज नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते आणि नारायण राणे या चारही नेत्यांचं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी आणि नेत्यांशी चांगली ओळख आहे त्याचबरोबर त्यांना संसदीय राजकारणाचाही दिर्घकाळ अनुभव आहे. त्यामुळे भाजपने ही जबाबदारी त्यांना सोपविल्याचं मानलं जातंय. विखे पाटील हे काँग्रेसमधून, गणेश नाईक आणि पाचपुते हे राष्ट्रवादीतून तर नारायण राणे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत.

राज्याच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. आमदारांचे अपहरण करणं आणि दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणं यात कसली चाणक्य नीतीय़ काकांनी जे कमावले तेच चोरुन मीच नेता माझाच पक्ष असं सांगणं वेडेपणाचा कळस आहे. अजित पवार खोटं बोलत आहेत. सामना सामनातून अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. या तिन्ही पक्षांनी 162 आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर आमदारांना सायंकाळी ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या