अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या ऐतिहासिक निकालावर संजय राऊतांनी केले 'हे' tweet

अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या ऐतिहासिक निकालावर संजय राऊतांनी केले 'हे' tweet

'पहले मंदिर, फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र में सरकार… जय श्रीराम!!!

  • Share this:

मुंबई,9 नोव्हेंबर: शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाचे देशभरात सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले असून शांततेचे आवाहन केले आहे. यादरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'ट्वीट' करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पहले मंदिर, फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र में सरकार… जय श्रीराम!!! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी सकाळीच दिले होते Good News!चे संकेत....

आजचा निकाल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस राजकीय गोड बातमीचा (Good News) नसून त्यापेक्षाही मोठी गोड बातमी येईल, असे वक्तव्य सकाळीच संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांनी संबोधित करताना सांगितले होते की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देशात एकमेव नेता होते, त्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले होते. बाबरी मशीद पाडण्याचे काम सैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले होते. बाळासाहेब या खटल्यातून निर्दोष सुटले होते, असेही राऊत म्हणाले.

अयोध्येला आम्ही जाऊन आलो. हा विषय सातत्याने लावून धरून शिवसेनेने सरकारवर दबाव कायम ठेवला. त्यास उद्धव ठाकरे यांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे तितके बाळासाहेबांचे. शरयू नदीत पाणी कमी आणि रक्त जास्त होते, शुभ कार्यक्रम सुरूवात आज होईल. पीएम यांना मागणी अध्यादेश काढा ही मागणी सेनेनी केली. पण त्यांनी मान्य केली नाही. अयोध्येत मंदिर होणार असेल तर त्यात शिवसेनेचा योगदान आहे. शिवसेनेचे खासदार मंदिर यासाठी पुन्हा अयोध्येला जातील, असेही राऊत यांनी सांगितले.

राऊतांचा भाजपाला टोला....

आता जे राम मंदिरविषयी बोलतात, ते त्यावेळेस बाबरी पाडली यावर बाळासाहेब ठाकरे यांनी एकमेव जोरदार समर्थन केले होते. कोणी एका संघटना योगदान नसल्याचे सांगत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवेदनातून खोटेपणा राग बाहेर पडला. आम्ही शुक्रवारी हा विषय संपवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. खोटे ठरवण्याचे प्रयत्न जे करतील त्याबाबत ठाकरे बोलले. ढोंगी राजकारण 70 वर्षांत नव्हे तितके आता झाले. त्यावर ठाकरे कडाडले. राजकारण निवडणूक पुरते. राम मंदिर हा आमचा मु्ददा नाही, भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. राम मंदिर होईल तर त्याचा पाया, विट शिवसेनेची होती इतके योगदान नक्कीच, जे आता बोलतात त्यावेळेस खाकावरून गायब झाले यावर आता जास्त बोलायचे नाही, असे सांगत राऊत यांनी सत्तासंघर्षावर बोलणे टाळले होते.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या