Sushant Suicide! ...अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का, अनेकांच्या काळजाला धक्का

Sushant Suicide! ...अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का, अनेकांच्या काळजाला धक्का

सुशांत यानं अचानक एक्झिट घेतल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूडच नव्हे तर राजकीय नेत्यांनीही सुशांतच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलं नाही. सुशांत यानं अचानक एक्झिट घेतल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूडच नव्हे तर राजकीय नेत्यांनीही सुशांतच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा.. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली भावना, म्हणाले...

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. खूप दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर पूछा न जिंदगी में किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है।, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

सुशांत सिंग राजपूत सारख्या हरहुन्नरी अभिनेत्यानं यशोशिखरावर असताना आत्महत्या करावी, हे अनेकांना न पचणारं आहे. सुशांत यांच्या आकस्मित निधनामुळे चित्रपट सृष्टीने अतिशय गुणवान अभिनेता गमावला आहे.

चला बघूया, सुशांत सिंहच्या एक्झिटबाबत कोण काय म्हणालं... ?

 

First published: June 14, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading