मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Sanjay Raut: "बाप-बेटा जेल जाऐंगे" महाराष्ट्र झुकेगा नहीं.... म्हणत संजय राऊतांची पुन्हा डरकाळी

Sanjay Raut: "बाप-बेटा जेल जाऐंगे" महाराष्ट्र झुकेगा नहीं.... म्हणत संजय राऊतांची पुन्हा डरकाळी

(File Photo)

(File Photo)

Sanjay Raut said Maharashtra Jhukega Nahi: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज एक ट्विट करत पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. आपल्या या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉगबाजीही केली आहे. 'महाराष्ट्र झुकेगा नहीं' असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 मार्च : शिवसेना (Shiv Sena) आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना 'डर्टी डझन' संबोधलं होतं. या नेत्यांनी भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा सांगतो 'बाप बेटे जेलमध्ये जाणार' असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. (Sanjay Raut said Bap Beta Jail Jayenge... Maharashtra Jhukega nahi) आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, "माझे शब्द अधोरेखित करा.... मी पुन्हा सांगतो 'बाप बेटे जेल जाऐंगे' आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील". इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेवटची ओळ ही पुष्पा सिनेमातील डायलॉगचा संदर्भ घेत लिहिली आहे. "महाराष्ट्र झुकेगा नहीं" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch, कोठडीचं Sanitization सुरू" शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर 16 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्हटलं, "बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!". वाचा : किरीट सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता किरीट सोमय्या आणि मुलावर आरोप 15 फेब्रुवारीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या या दोघांवरही गंभीर आरोप केले होते. 'भाजपचे दलाल लोक, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कुटुंबीयांची प्रकरण बाहेर काढत आहे. पण फडणवीस सरकारच्या काळात सर्वात मोठा घोटाळा झाला. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. अमोल काळे कोण आहे, विजय ढवंगाळे कोण आहे, सर्वांची खाती, बँकेतील व्यवहार, कुणाला कंत्राट दिले आहे? असा सवाल राऊत यांनी केला होता. तसंच, राकेश वाधवानी याने भाजपला 20 कोटी रुपये दिले होते. पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवाणी याचे नाव समोर आले होते.किरीट सोमय्या हे राकेश वाधवानी याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. पण, निकॉन इन्फ्रास्ट्रकचर कंपनी कुणाची आहे. की कंपनी किरीट सोमय्यांची आहे. त्यांचा मुलगा नील सोमय्यांची आहे. निकॉन कंपनीसाठी पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा वापरला असून वसईमध्ये गोखीवरे तालुक्यात हजारो कोटींचा प्रकल्प उभा केला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. वाचा : नवाब मलिकांची सुटका की पुन्हा कोठडी? उद्या कोर्टात महत्त्वाची सुनावणी 'पीएमसी घोटाळ्याचा मास्टरमाईंड राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केले. कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली. फ्रँटमन असलेला लधानीच्या नावावर जमीन घेतली. 80 कोटी रुपये कॅश घेतली आहे. गोखीवरे वसई येतील 400 कोटी रुपयांची जमीन साडेचार कोटींना घेतली आहे. एकूण दोन जमिनी घेतल्या आहे. या कंपनीचा डायरेक्टर किरीट सोमय्यांचा मुलगा आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज टू यासाठी पीएमसी बँकेचा पैसा आहे. याला कोणतीही परवानगी नाही. पर्यावरणाची कोणतीही परवानगी घेतली नाही' असा दावाही राऊत यांनी केला होता. 'आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे की, त्यांनी ताबडतोब या कंपनीवर कारवाई करावी. पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, तिथे दिलासा मिळाला नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. पण न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या